Supriya Sule : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती की महाविकास आघाडी? कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान बारामती विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे.

बारामतीत पवार विरुद्ध पवार

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांचं नाव विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलं. यामुळे बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत दिसणार आहे. आज सुप्रिया सुळे यांच्यासह जात युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Ajit Pawar On Sharad Pawar Baramati Election 2024
Ajit Pawar : ‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’; अजित पवारांचं बारामतीत शरद पवारांबाबत मोठं विधान
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
sharad pawar ajit pawar supreme court clock symbol
Supreme Court : ‘घड्याळ’ कोणाचं? शरद पवार की अजित पवार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”

युगेंद्र पवार यांचा बारामतीतून अर्ज दाखल

बारामतीतून सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार उतरले होते. “आम्ही लोकसभेला चांगली कामगिरी केली. तशीच चांगली कामगिरी आम्ही विधानसभा निवडणुकीतही करणार आहोत. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे. शरद पवार जे उमेदवार जाहीर करतील त्यांना मी पाठिंबा देईन” असंही युगेंद्र पवार म्हणाले होते. याच युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांनी आमराई या घराला भेट दिली. कारण शरद पवारांनी इथूनच त्यांचं राजकारण सुरु केलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी बारामतीकर आणि आमचं नातं हे मतांचं नाही तर मनाचं आहे अशी प्रतिक्रिया दिली.

हे पण वाचा- Supriya Sule: बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण; धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल्या?

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“मी सगळ्यांच्या चांगल्या आठवणीच लक्षात ठेवते. बारामतीची मायबाप जनता शरद पवारांवर सहा दशकांपासून प्रेम करते आहे. आमचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे. एक काळ असाही होता की पवार कुटुंबाला कुणी ओळखत नव्हतं पण बारामतीकरांनी जी आपुलकी आणि प्रेम दाखवलं त्यामुळे पवार कुटुंब ओळखलं जातं. अजित पवार वेगळे झाले त्याची वेदना आहेच. कारण मी नात्यांना खूप महत्त्व देते. नाती फक्त रक्ताची नाही तर प्रेम आणि विश्वासाची असतात. सत्ता आणि पैसा येतात आणि जातात पण नाती महत्त्वाची असतात तीच टिकतात. ” असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.

Supriya sule and ajit pawar
सुप्रिया सुळे यांची अजित पवारांवर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अजित पवारांची भाऊबीजेला वाट पाहणार का?

अजित पवारांची भाऊबीजेला वाट पाहणार का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या, “कसं असतं एकतर प्रेम कुठूनही केलं तरीही ते प्रेमच असतं. ते एकतर्फीही असू शकतं. आपण प्रेम जेव्हा करतो तेव्हा अपेक्षा कशाला ठेवायची? ” असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. बारामतीत युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करण्याआधी सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांबाबत हे विधान केलं आहे.