राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीवर मोठं विधान केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचं असतं,” असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट झाली नसल्याचा दावा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. काहीवेळा हे प्रयत्न अपयशी ठरेल, तर काहीवेळा यश मिळालं. पक्ष फोडणे, साम-दाम-दंड-भेद हे देवेंद्र फडणवीसांचेच शब्द आहेत. त्यांना काहीही करून सत्तेत यायचं असतं.”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आम्ही त्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्या तक्रारीवर प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादीत कोणताही फूट झालेली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रीपद”, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थान काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थान काय? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार आहेत. आत्ता त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule big statement about ncp rebel split ajit pawar sharad pawar pbs
Show comments