राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर महाविकासआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दावा केला की, अजित पवार शरद पवारांना भाजपाबरोबर घेऊन गेल्यावरच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या बुधवारी (१६ ऑगस्ट) माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्यासाठी तरी अजून ही लोकशाही आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला जे वाटतं ते त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत मी नव्हते. त्यामुळे तेथे काय चर्चा झाली हे मला माहिती नाही.”

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”

“पवार व चोरडिया कुटुंब भेटणं यात वावगं किंवा आश्चर्यजनक काहीही नाही”

“माझ्याच नाही, तर अगदी अजित पवारांच्या जन्माआधीपासून चोरडिया व पवार कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. शरद पवार आणि अतुल चोरडिया यांचे वडील एकत्र महाविद्यालयात होते. त्यामुळे पवार कुटुंब व चोरडिया कुटुंब भेटणं यात वावगं किंवा आश्चर्यजनक काहीही नाही. आमचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. हे सर्वांनाच माहिती आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “अजित पवारांनी शरद पवारांना सोबत आणलं, तरच भाजपा…”, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा, म्हणाले…

“चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहे”

“चोरडिया कुटुंबाकडे जाणं, भेटणं, एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत असणं वावगं नाही. चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहे. सहा दशकांहून जास्त काळ आम्ही एकमेकांबरोबर आहोत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

Story img Loader