राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आगमी काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल यावर भाष्य केले. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वास्तव ते जगुया. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकारचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान, म्हणाले “आपलाच…”

“सध्या वास्तव ते जगुया. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकारचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं वाटतं, यात गैर काय. माझं मत आहे की वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत. आपलं महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाच्या मागे न लगता सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत हे महत्त्वाचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >>> ‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’, आमदार रवी राणा यांचं मोठं विधान

तसेच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment on dhananjay munde next maharashtra cm statement prd
Show comments