राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील हरिश्चंद्री येथे बोलताना शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांचाच पक्ष खरी शिवसेना आहे. तसेच शरद पवार यांचाच पक्ष ही खरी राष्ट्रवादी आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे प्रेमाने पक्ष मागितला असता तर आम्ही तो दिलदारपणे दिला असता, असेही सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून त्यांचे नाव न घेता म्हणाल्या.

“….तर तुम्ही कोणता पर्याय निवडला असता”

सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या की, सगळे म्हणतात माझ्या भाषणाला आजकाल धार आली आहे. हो आली आहे. कारण माझ्यापुढे दोन मार्ग होते. एका बाजूला सत्ता आणि अदृश्य शक्ती होती. तर दुसऱ्या बाजूला विचार, संघर्ष आणि वडील होते. माझ्या जागेवर तुम्ही असते तर तुम्ही कोणता पर्याय निवडला असता. सुप्रिया सुळे नेहमी संघर्ष निवडेल. त्यांनी अन्याय केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी वंदनीय आहेत. उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांनींच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष दिला. १० वर्षे काम पाहून आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांना नेता मानलं. पण अदृश्य शक्तीने काय जादू केली माहिती नाही.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

“त्यांनी जे चोरून नेलं आहे, त्याला…”

“तुम्ही सगळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ठाकरे गट म्हणता. मप मी म्हणते ठाकरे गट वगैरे काही नाही. आपल्यासाठी एकच सेना आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. त्यांनी जे चोरून नेलं आहे, त्याला काही किंमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही हेच लागू होतं,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“अरे प्रेमाने मागितलं असतं तर…”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली आहे. चिन्ह आणि पक्ष हे शरद पवार यांचेच आहेत. आमची त्यांच्याशी (अजित पवार गट) तत्त्वाची लढाई आहे. अरे प्रेमाने मागितलं असतं तर आम्ही दिलदारपणे दिलं असतं,” असं सुप्रिया सुळे अजित पवार यांना उद्देशून त्यांचे न घेता म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहेत. आम्ही महाराष्ट्राचं वाटोळं करू असं अदृश्य शक्तींना वाटत असेल तर ते आम्ही करू देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Story img Loader