मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दोन समुदायातील वादामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. तसेच अनेकदा जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. अशातच मणिपूरमधील या परिस्थितीबाबत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केलं. दरम्यान, आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मोहन भागवत यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मणिपूरच्या प्रश्नाकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय हे खरं करून असून ते मणिपूरचा म देखील बोलायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maharashtra assembly Election 2024 shekap fights for survival alibag assembly constituency
अलिबागमध्ये शेकापची प्रतिष्ठा पणाला
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा

हेही वाचा – मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांची मळमळ…”

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“गेल्या वर्षभरात मणिपूरच्या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली आहे. मणिपूर हा आपल्या देशाचा महत्त्वाचा भाग आहे. तिथल्या महिला, मुलं, पुरुष हे सगळे भारतीय आहेत. काल परवाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला आहे. यांचा अर्थ काही तरी चुकतयं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी आम्ही अनेकदा केली आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर चर्चा केली नाही. हे सरकार मणिपूरचा म देखील बोलायला तयार नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मणिपूरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिथे जाऊ दिलं नाही. मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, मग तिथल्या लोकांना अशी वागणूक का दिली जात आहे”, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचा – “नाद करा! पण शरद पवारांचा कुठं? ते थेट..”, निलेश लंकेंचा अजित पवारांना टोला

मोहन भागवत काय म्हणाले होते?

दरम्यान, काल ( मंगळवारी ) नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. “गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांतता प्रस्तापित होण्याची वाट बघतो आहे. त्यापूर्वी १० वर्ष मणिपूरमध्ये शांतता होती. तेथील गन कर्ल्चर संपुष्टात आलं, असं वाटत होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिथे अचानक हिंसाचार उफाळून आला किंवा उफाळून आणल्या गेला. तेव्हापासून आजपर्यंत मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या मुद्द्याकडे प्राथमिकतेने लक्ष्य द्यायला हवं. हे आपलं कर्तव्य आहे”, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली होती.