मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसंच, पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची संधी नसल्याने . त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा अथवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भाजपाला त्यांचा पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीचे लोक सतत आयात करावे लागतात हे दुर्दैवं आहे”, असं सुप्रिया सुळे ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. तर टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मिलिंद देवरांना माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यांच्यासोबत आमचे कौटुंबिक संबंध होते. आजही आहेत. उद्याही राहतील.

हेही वाचा >> VIDEO : मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती; म्हणाले, “मी काँग्रेस सोडेन वाटलं नव्हतं, पण…”

“महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज भापजा आणि त्यांचे मित्रपक्ष हे काँग्रेसवालेच झालेत. भाजपामध्ये टॅलेंट नाही की काय अशी परिस्थिती झाली आहे. त्यांच्या आघाडीतही (महायुती) काँग्रेसचेच लोक जास्त दिसतात. काँग्रेसचा विचार काँग्रेसपेक्षा हा भाजपातच जास्त आहे. भाजपात टॅलेंट नाही का? ज्या लोकांनी कष्ट केले. सतरंज्या उचलल्या, आंदोलने केली, मग त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काय. दक्षिण मुंबईत भाजपाचे काम करणारे आमदार नाहीत का. त्यांच्यावर का अन्याय होतोय”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“आम्ही जेव्हा एखादी यात्रा सुरू करतो तेव्हा ते काहीतरी कट रचतात, अशी टीका काँग्रेसचे मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष पवन खेरा म्हणाले.

हेही वाचा >> “स्वर्गीय मुरली देवरा यांनाही…”, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावरून बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

मी खूप भावूक…

पक्षप्रवेशानंतर संवाद साधताना मिलिंद देवरा म्हणाले, “मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. पण, काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षे असलेले नाते मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करणं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना मुख्यमंत्र्यांना माहिती असतात. म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात मला बळकट करायचे आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticizes bjp on milind deoras entry into shinde group sgk