पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अजित पवार आणि त्यांची आई आशा पवार यांनी एकत्र येऊन मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आशा पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क-वितर्कांना सुरुवात तर झालीच, पण अजित पवारांचे आईबरोबरचे छायाचित्र, सुप्रिया सुळे यांचे शरद पवार यांच्याबरोबरचे छायाचित्र, तसेच पवार कुटुंबातील इतरांचेही मतदानानंतरचे ‘फॅॅमिली फोटो’ हे एकूणच चित्र ‘भावनिक’ असल्याची चर्चा झाली.

या चर्चेला प्रचाराचीही पार्श्वभूमी होती. ही लढाई कौटुंबिक किंवा भावनिक नाही, तर ती वैचारिक लढाई असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला होता. बारामतीमधील प्रचार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भावनिक मुद्द्यांभोवतीच फिरत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार वगळता अन्य पवार कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांचाही समावेश होता. त्यानंतर ‘मला कुटुंबात एकटे पाडले जात आहे,’ असे सांगून अजित पवार यांनी भावनिक मुद्दा उपस्थित केला.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Thane district Pipani trumpet election symbol NCP Sharad Pawar
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

हेही वाचा >>> निवडणूक वाचवण्यासाठी भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रात पैसे वाटपाचा मारा; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मतदानाच्या दिवशी अजित पवार यांनी आई आशा पवार यांच्या समवेत काटेवाडी येथे मतदान केले. पवार कुटुंबात माझी आई सर्वांत ज्येष्ठ आहे आणि माझी आई माझ्याबरोबर आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मतदानानंतर दिली. या विधानाची चर्चा सुरू झाली असतानाच सुप्रिया सुळे यांनी काटेवाडी येथे आशा पवार यांची भेट घेतली. गेल्या दीड महिन्यात त्यांची भेट घेण्यास सुप्रिया सुळे यांना वेळ मिळाला नाही का, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘भावा-बहिणीची भेट होणे गैर नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी भेटीचे समर्थन केले. ‘मी अजित पवारांना भेटले नाही. आशा पवार माझ्या काकू आहेत. लहानपणी मी काटेवाडीत राहिले होते. त्यामुळे काकूला भेटले, असे त्या म्हणाल्या, तर, ‘कोणी कोणाला भेटले म्हणून मतदानावर परिणाम होत नाही,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.