मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं. एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का? यावर चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नावांची चर्चा होत आहे. सुप्रिया सुळेच राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्ष होतील अशी शक्यता व्यक्त होत असताना त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासूनच सुप्रिया सुळेंचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षा म्हणून घेतलं जात आहे. दुसरीकडे अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना समजावताना नव्या अध्यक्षांच्या पाठिशी आपण सगळे उभे राहू, असं म्हटल्यामुळे ते स्वत: अध्यक्ष होणार नसल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”

यशवंतराव चव्हाण सेंटरवर आज शरद पवार दाखल झाले होते. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेतेमंडळीही होती. त्यामुळे आजच नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असं म्हटलं जात होतं. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडताच प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली.

“राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. “मला अध्यक्ष होण्यात अजिबात रस नाही. माझ्याकडे आधीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मी आधीच पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे”, असं ते म्हणाले.

शरद पवारांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही

“वाय बी सेंटरला शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अनेक मान्यवरांची भेट घेतली. आज राष्ट्रवादी पक्षाची बैठक नव्हती. आज ना बैठक झाली ना कोणताही निर्णय झाला. अनेक उलट-सुलट बातम्या टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून येत आहेत. शरद पवारांनी काल घेतलेला निर्णय मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. त्यांच्या मनात काय आहे, याबाबत त्यांनी अद्याप स्पष्टीकरण केलेलं नाही. उद्या आम्ही पुन्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. जे काही अधिकृत असेल, ते आम्ही तुम्हाला सांगू”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होणार? जितेंद्र आव्हाड स्पष्टच म्हणाले…

सुप्रिया सुळे नवीन अध्यक्ष होणार?

दरम्यान, आज सकाळपासूनच सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा चालू आहे. मात्र, हे सर्व तर्क असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. “सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे. कुणी काही विधान दिलं की त्यावर सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवली. हे चुकीचं आहे. पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की ना पक्षाची कोणती बैठक झालेली आहे ना कोणता निर्णय झालेला आहे. बैठक होईल, तेव्हा मीच तु्म्हाला सांगेन”, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.