ईडीपासून सुटका मिळावी यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं दावा छगन भुजबळ यांनी केल्याचा उल्लेख ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात करण्यात आला आहे. छगन भुजबळांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातवरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तसेच यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष आणि घर फोडण्याचं पाप अदृष्य शक्ती करते आहे. हे आम्ही गेले दोन वर्ष सांगत आहोत. हे फक्त महाराष्ट्रापूरतं मर्यादित नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हेच सुरु आहे. ९५ टक्के ईडी आणि सीबीआयचे छापे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पडले आहेत. ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले, त्यांनाच बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. मी संसदेतही यासंदर्भातील आरोप केले आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
ajit pawar bjp seat sharing assembly election
महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”

हेही वाचा – Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “जोपर्यंत…”

“अदृष्य शक्ती पुरुषांच्याच नाही, तर महिलांच्याही मागे लागते”

“या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. त्या वाचताना मला वाईट वाटलं. यात आमच्या पक्षातील नेत्यांबरोबच महिलांचाही उल्लेख आहे. अदृष्य शक्ती ही फक्त पुरुषांच्याच नाही, तर महिलांच्याही मागे लागते. याचं उदाहरण म्हणजे माझ्या तीन बहीणींच्या घरावर आयकर विभागाचा छापा. एक दिवस नाही तर सलग पाच दिवस ही छापेमारी सुरू होती. त्यावेळी त्यांच्या घरात त्यांची नातवंड होती. घरात वेळेवर दुध येत नव्हतं. बंदुके घेऊन पोलीसं फिरत होती. हे बघून त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार अदृष्य शक्तीने केला का?” असेही त्या म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला भरला पाहिजे”

“ज्यावेळी आर. आर. पाटील यांच्यावर या सगळ्यांनी मिळून आरोप केले. त्या फाईलवर शेवटची चौकशी कुणी लावली, तर ती देवेंद्र फडणवीस यांनी लावली. त्यावर त्यांचीच सही होती. मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्या विरोधात ही कारवाई सुरु झाली, त्याच अजित पवारांना त्यांनी घरी बोलवून ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला भरला पाहिजे. त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. या सगळ्यांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागतील”, अशा घणाघातही त्यांनी केला.

हेही वाचा – Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!

“तुमची लढाई आमच्याशी, मग महिलांवर आरोप का करता”

“या पुस्तकात सुनेत्रा पवार यांचेही नाव आहे. हे दुर्देव आहे. यात त्यांचा उल्लेख करायची काहीही गरज नव्हती. तुमची लढाई आमच्याशी आहे, तर मग आमच्या घऱातील महिलांवर का आरोप करता?” असेही त्या म्हणाल्या.