अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील हे अजित पवार गटात गेल्यास त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असंही बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, असं मिश्किल वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा – “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

अजित पवार गटाकडे गेल्यास जयंत पाटलांना मुख्यमंत्री केलं जाईल, या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वाह… वाह… चांगली गोष्ट आहे. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल.” सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर स्वत: जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- भाजपा नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “हुकूमशाहीची वळवळ…”

“महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागली आहे. इकडून तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री… तिकडून इकडे आल्यावर मुख्यमंत्री… इकडे दोन-तीन मुख्यमंत्री… तिकडे दोन-तीन मुख्यमंत्री… आणि रांगेत आणखी बरेच मुख्यमंत्री… त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल, असं मला वाटतं” अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on jayant patil being chief minister from ajit pawar faction rmm
Show comments