राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीत सामील होण्यासाठी शरद पवारांची समजूत काढली जात आहे. भाजपाने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला कुणीही कसलीही ऑफर दिली नाही. १५ ऑगस्टनिमित्त अनेक ठिकाणी सेल सुरू आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे किराणा सामानावर काही ऑफर्स सुरू आहेत. ते मी वर्तमानपत्रात वाचलं, याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ऑफरबद्दल मला काहीही माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “मी त्यावर कोणतंही विधान करू इच्छित नाही. कारण मी सातत्याने राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि गौरव गोगई यांच्याशी वैयक्तिक संपर्कात आहे. मी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते काय म्हणतायत, हे मला माहीत नाही.”

हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

“मी काँग्रेसच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात आहे. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा दररोज एकमेकांशी संवाद होतो. मी आणि राहुल गांधी संसदेत एकाच बेंचवर बसतो. त्यामुळे माझा त्यांच्याशी चांगला संवाद आहे. गौरव गोगईही आमच्याबरोबर बसतात. संसदेत विरोधी पक्षाची रणनीती कशी असावी? यावर आमचं बोलणं होतं. मी दिल्लीतील त्यांच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात आहे, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नाही”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on mahavikas aghadi in contact with congress senior leaders like sonia gandhi rahul gandhi rmm
Show comments