भारतीय राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा वारंवार चर्चेला येत असतो. मग ते सत्ताधारी असोत किंवा मग विरोधी पक्ष, दोन्ही बाजूला अनेक वर्षांचा राजकीय वारसा सांगणारी घराणी पाहायला मिळतात. मात्र, त्याचवेळी या दोन्ही बाजू एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करतानाच आपल्यावर होणारे आरोप फेटाळताना दिसतात. यादरम्यान, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मात्र घराणेशाहीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणा विरोधकांना लक्ष्य करत असल्याचं सांगताना “९५ टक्के चौकशा विरोधकांच्या झाल्या आहेत. संसदेतील माहितीच हे सांगते”, असं त्या म्हणाल्या. त्याचवेळी देशाच्या संविधानाला भाजपाकडून धोका असल्याच्या भूमिकेचा अप्रत्यक्षपणे पुनरुच्चार करताना “संविधानाच्या बाबतीत भाजपाचेच दोन खासदार बोलले आहेत. त्याबद्दल मला काही बोलायची गरज नाही”, असं त्या म्हणाल्या.

वाय. बी. सेंटरवर ‘ती’ बैठक झाली की नाही?

दरम्यान, विरोधकांच्या एका बैठकीत खर्गेंवर रागावल्यामुळे शरद पवार भर बैठकीतून निघून गेले होते असा उल्लेख अजित पवारांनी भाषणात केल्याचं सांगत त्यासंदर्भात माध्यमांनी खुलासा विचारला असता सुप्रिया सुळेंनी तशी काही घटना घडल्याची शक्यता फेटाळून लावली. “वाय बी सेंटरमधल्या सगळ्या बैठकांना मी नव्हते. पण तिथे असं काही घडल्याचं मला आठवत नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!

“देश परिवारवादाचा तिरस्कार करतो” असं विधान मोदींनी केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. “बरोबरच आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असे आम्ही तिघेही राजकारणात परिवारवादातूनच पुढे आलो आहोत. शून्यातून शरद पवारांनी विश्व उभं केलं. अजित पवार आणि मी, आम्हा दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालं आहे. मी तर संसदेतही बोलले आहे, आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून परिवारवादाचे भाग आहोतच की. ते नाकारून कसं चालेल?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on pm narendra modi ajit pawar speech amid loksabha election 2024 pmw
Show comments