राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धार्मिक श्रद्धा हा मागील काही आठवड्यांपासून राज्यातील राजकारणामधील चर्चेचा विषय ठरत आहे. शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी पुण्यामध्ये असताना शरद पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये प्रवेश न करता दारामधूनच गपणतीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा पवारांच्या धार्मिक श्रद्धेचा विषय चर्चेत आलाय. याच प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलंय. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये शरद पवारांनी प्रवेश न करण्यासंदर्भात सुप्रिया यांनी आपली भूमिका यावेळी सविस्तरपणे स्पष्ट केली.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: गर्दी जमली, सत्कार झाला पण शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिरात प्रवेश न करता लांबूनच पाया पडून परतले कारण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दर्शनाचा दौरा नसतो…
पुण्यामधील या प्रकरणासंदर्भात आणि त्यानंतर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेसंदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारताना ‘शरद पवार यांचा दर्शनाचा दौरा’ असा उल्लेख केला. त्यावरुनच सुप्रिया सुळेंनी प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. “दर्शनाचा दौरा नसतो हा,” असं सुप्रिया म्हणाल्या आणि उपस्थितांमध्ये हसू पिकलं. त्यानंतर पत्रकाराने चूक सुधारत दौऱ्यादरम्यान दर्शन केलं असं म्हटलं.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुन्हा दाखल केल्यावर…”; NCP कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवरही केलं भाष्य

…अन् पवारांनी तीन लाखांचा चेक पाठवला
“मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. हे तुम्ही व्हेरिफाय करा रेकॉर्डवर. काल मी परभणीला गेले होते. तिथे एक साठेकाका की काय नावाचे गृहस्थ आहेत. मला नीट नाव आठवत नाही पण ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मी आणि फौजियाताई (राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान) दर्शनाला गेलो. आमच्या दौऱ्याच्या मार्गात होतं ते. तिथल्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण केलं आम्ही गेलो. दर्शन करुन निघताना बाहेर तिथल्या मंदिराचे जे विश्वस्त आहेत त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही किती वर्षांनी आलात. मी म्हटलं का ओ? त्यावर ते म्हणाले. तुमचे वडील १९९३ मध्ये मुख्यमंत्री असताना या मंदिरामध्ये आले होते. आम्ही त्यांना तीन लाख रुपये मागितले होते. ते तेव्हा काही बोलले नाहीत, ते मुंबईला गेले. त्यानंतर आठ दिवसांच्या आत तीन लाख रुपयांचा चेक १९९३ त्यांना दिला, हे त्यांनी सांगितलं,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नक्की वाचा >> घरी जा, स्वयंपाक करा प्रकरण: चंद्रकांत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “एक तर पहिल्यापासूनच मी…”

सिद्धीविनायक मंदिराचा केला उल्लेख…
पुढे बोलताना, “अजून बरीच उदाहरणं देते तुम्हाला. सिद्धीविनायक मंदिराचं रिनोव्हेशन झालं ना. ती पाटी जाऊन बघा, त्याच्यावर कुणाचं नाव आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. “त्यामुळे आरोप जे करतात ना ते आरोप किती खोल आहे हे त्यांच्या कृती आणि आऊटकम्स मधूनच पाहिलं. आणि अशी अनेक आहेत मंदिरांची उदाहरणं, मी तुम्हाला देऊ शकते. आता सगळ्यांचा वेळ नाही घेणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

नास्तिक असण्यासंदर्भात विचारलं असता म्हणाल्या…
पुढे पत्रकाराने नास्तिक असण्यासंदर्भातील प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी, “ठिक आहे ना मग, तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तुम्हाला विचारलं का तुम्ही नास्तिक आहात, आस्तिक आहात? तुम्हाला पगार कशासाठी मिळतो? तुमचं काम आहे ना. असं थोडी असतं, जरा राजकारण थोडं गांभीर्याने घेऊयात. आम्हाला विचारा ना पाण्याच्या प्रश्नाचं काय, भुकेचं काय, नोकऱ्यांचं काय असे विचारा जरा प्रश्न आमच्या सरकारला,” असं हसत हसत सांगितलं.