Supriya Sule On Ajit Pawar : गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय संबंध संपुष्टात आले आहेत. अशात आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी, अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकते का? यावर भाष्य केले आहे. अजित पवार जोपर्यंत भाजपाबरोबर आहेत, तोपर्यंत हे शक्य नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

“अजित पवार जोपर्यंत भाजपबरोबर आहेत, तोपर्यंत राजकीयदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हे सांगणे खूप अवघड आहे. हे सहजासहजी शक्य नाही. कारण आमची व भाजपाची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या एकत्र येणे आव्हान आहे,” असे सुप्रिया सुळे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.

Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Uddhav Thackeray On Amit Thackeray
Uddhav Thackeray : अमित ठाकरेंच्या विरोधात माहिममध्ये सभा घेणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आवश्यकता…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : ‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी महायुतीमध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा ठोकला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानेही पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले होते. पुढे मे-जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात महायुतीचा धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्ट्राइक रेटच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी केली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली. याचबरोबर बारामतीमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पक्ष फुटून ४० आमदार जरी सोडून गेले तरी त्यांच्यावर पवार भारी ठरले होते.

आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांच्यासमोर राज्यासह बारामतीमध्येही शरद पवार यांचे आव्हान असणार आहे. कारण महायुतीतून अजित पवारांच्या वाट्याला आलेल्या ५५ पैकी बहुतांश जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. लोकसभेचा निकाल आणि शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत मिळत असलेला प्रतिसाद पाहता अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत अवघड असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे बारामतीतही अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत.