राज्यातील सत्ताबदलानंतर आता यंदाचा शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. कारण, शिवतीर्तावरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून दोन्हीकडून मेळावा आम्हीच घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांकडूनही यासंदर्भात मतं व्यक्त केली जात आहेत. दरम्यान, भाजपाकडून उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेऊ ने देण्यासाठी आणि एकनाथ शिंदें गटाचा मेळावा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी बारामती मतदार संघातील प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
विरोधक दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण… – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे प्रतिक्रिया; जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-09-2022 at 12:03 IST
TOPICSबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Senaसुप्रिया सुळेSupriya Sule
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule reacted to shiv senas dussehra gathering msr