राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी आज मतदान होत आहे. आज (५ नोव्हेंबर) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांदेखत (हयातीत) माझ्या मुलाने (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे. अजित पवारांच्या आईनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

हेही वाचा- “अक्कल नसलेल्या माणसाला…”, अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं सडेतोड उत्तर

“माझ्या डोळ्यांदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या आईच्या इच्छेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही.” सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “अजितदादांच्या स्वप्नांसाठी त्यांच्या आईने प्रार्थना केली असेल तर ती स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांची प्रार्थना अजित पवारांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अजित पवारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झालं तर त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकेल,” असं वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा- “माझ्या हयातीतच मुलानं मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार नेमकं काय म्हणाल्या?

“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले. अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांदेखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात,” असं आशाताई पवार म्हणाल्या.

Story img Loader