भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत,’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात अजित पवार यांचा गट आक्रमक झाला आहे. पडळकरांविरूद्ध राज्यात आंदोलनही करण्यात आली. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

Governor C P Radhakrishnan addressed farmer issues and suicides stating government is taking serious measures
बुलढाणा : राज्यपाल म्हणतात,‘शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी…’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
Counter movement by OBC leaders opposing Manoj Jarange agitation for Maratha reservation demand
आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना

हेही वाचा : “फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी”, जयंत पाटलांच्या विधानावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“अजित पवारांचा अपमान करण्यासाठी भाजपानं बरोबर घेतलं का?”

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे.”

“मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे. हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान आहे,” अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

“पडळकरांचं वक्तव्य अयोग्य”

पडळकरांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी मांडलं आहे.

हेही वाचा : “…हे म्हणजे शिळ्या कडीला उत आणण्यासारखं आहे”, रूपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

“अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे…”

तर, ‘अजित पवार पडळकरांसारख्यांना चिरडण्याची भूमिका घेतील,’ असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवार यांना लांडगा म्हणत असेल, तर ते काय आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील. तेव्हा अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे दाखवून देतील,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.