खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे आमने-सामने आले आहेत. “स्वत:चं राजकीय अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यांवर आरोप केले जातात,” अशी टीका सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर केली होती. यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्यावर संस्कार असल्याने मी मर्यादा ओलांडणार नाही,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

“संसदेत महिला आरक्षण कायदा पास करण्यासाठी मतदान झालं. तेव्हा सुनील तटकरे हजर नव्हते. भाजपाबरोबर तडजोड केल्याने नैतिकतेच्या आधारावर तटकरेंच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

हेही वाचा : “२०० आमदार असूनही राज्य सरकार अस्थिर”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले…

सुप्रिया सुळेंच्या विधानावर बोलताना सुनील तटकरेंनी शुक्रवारी ( २४ नोव्हेंबर ) म्हटलं, “केवळ टीका करण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी बोलल्या जातात. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळी मी मतदान केलं नाही.’ खरे आहे. मी पंतप्रधान मोदींचं भाषण पूर्णपणे ऐकलं. मी वारंवार सांगितलंय की, ‘गणेशोत्सवाचा पहिला दिवस असल्याने घरी होतो.’ लोकसभेचे ५४२ सदस्य आहेत. मतदानात सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या ४८० होती. त्यामुळे बाकीचे सगळे महिला विरोधी असल्याचं म्हणणं चुकीचं आहे.”

“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यांवर आरोप केले जातात,” असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं होतं.

हेही वाचा : “मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्षे…”, अजित पवारांचं विधान, गृहमंत्र्यांच्या भेटीवरही सौडलं मौन

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्यावर वेणुताई-यशवंतराव चव्हाण, प्रतिभा आणि शरद पवार यांचे संस्कार आहेत. त्यामुळे ती मर्यादा कधीही ओलांडणार नाही. माझ्यावर आई-वडिलांनी सुसंस्कृत संस्कार केले आहेत.”

Story img Loader