सांगली : इलेक्शन म्हणजे एक आनंदाचा सण आहे. या सणात पंधरा दिवस घरात यायलाच नको, तिकडेच काय बडबड करायची ती कर, असे नवऱ्याने सांगितले. तर गेली दीड वर्षे मी बाहेर फिरते आहे त्यामुळे घरात पोरंही आता मावशी म्हणायला लागली आहेत, अशा शब्दांत खा. सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी औदुंबर येथे बोलताना शाब्दिक कोटी केली.
औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज करण्यात आला. यावेळी आमदार जयंत पाटील, आ. अरूण लाड आदी नेतेमंडळी सभास्थळी येण्यापूर्वीच खा. प्रणिती शिंदे, मोहनराव कदम, शिवाजीराव कदम यांच्या उपस्थितीत खा. सुळे यांनी आपले छोटेसे भाषण उरकून घेतले. बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला असून, त्या ठिकाणी जाण्यासाठी अन्य नेत्यांची प्रतीक्षा न करता आपण भाषण करून पुढे जात असल्याचे सांगत खा. सुळे यांनी आपले मनोगत मांडले. त्यांच्या भाषणातील या कोट्यांना उपस्थितांनी देखील जोरात हशा करत दाद दिली.
यावेळी खा. सुळे म्हणाल्या की, डॉ. कदम यांनी महापुराच्या काळात चोवीस तास सेवा केली असून, पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. राज्यात सत्ताबदल होणार असून, पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान मिळणार आहे.