Supriya Sule On Santosh Deshmukh Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यामुळे अजूनही राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला २५ दिवस होऊनही पोलिसांना अद्याप सर्व मारेकऱ्यांना अटक करता आलेली नाही.

दरम्यान आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आले आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून फरार होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. या प्रकरणातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kailas Gorantyal
Kailas Gorantyal : “जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा”, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं मोठं विधान, चर्चांना उधाण
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान
Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana
Manikrao Kokate : “कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, लाडकी बहीण योजनेबाबत कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं विधान
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
On Saturday false message of bomb being placed in control room
बॉम्ब लावल्याचा निनावी खोटा फोन, पोलीसांची धावपळ
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!

मुख्य आरोपींपैकी दोघांना आज पुण्यातून अटक केल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “या प्रकरणातील सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत”, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येची दिल्लीतही चर्चा

राष्ट्रवादीच्या (शरद पवार) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संतोष देशमुख हत्या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “उशीरा का होईना, पण या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सापडेल आहेत. पण, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे की, या केसमध्ये ज्या अटक होत आहेत त्या पुण्यातूनच कशा होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी यावर अधिकृत माहिती द्यावी. कारण, हे प्रकरण आता महाराष्ट्रापुरते राहिले नाही. याबाबत दिल्लीतही चर्चा सुरू असून, दिल्लीतील वर्तमानपत्रांमध्येही याबाबत बातम्या येत आहेत.”

दोन आरोपींना पुण्यातून अटक

या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना आज पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. वायभसे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट

एक आरोपी फरार

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. यातील विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. तर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. आज अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींपैकी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

Story img Loader