अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. या दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अजित पवारांच्या गटाने मूळ पक्षावर आणि पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर दावा केल्यामुळे हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर आतापर्यंत दोन सुनावण्या पार पडल्या आहेत. पुढची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होईल. दरम्यान, शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीवर भाष्य केलं आहे. तसेच सुप्रिया सुळे अजित पवार गटातील नेत्यांना म्हणाल्या, तुम्ही मागितलं असतं तर सगळं काही तुम्हाला दिलं असतं. पक्ष ओरबाडण्याचा प्रयत्न करण्याची गरज नव्हती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in