शरद पवार यांनी मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेनंतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शरद पवारांच्या निर्णयाला विरोध केला. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या घटनेवर शरद पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा देणं हे काही थेट झालं नव्हतं. १५ दिवस आधीच हा विषय झाला होता. त्यांच्या घरात याविषयी चर्चा झाली होती, कदाचित अजित पवारांना हा विषय माहिती असावा. खरंतर, तेव्हा असं ठरलं होतं की शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्षपदी नेमायचं आणि मग राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जायचं. त्यामुळेच त्यांनी अचानक राजीनामा दिला. शरद पवार राजीनामा देणार आहेत याची मलाही कल्पना नव्हती.”

भुजबळ यांच्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्ताव होता. परंतु, ही गोष्ट मला स्वतःला अस्वस्थ करणारी होती. कारण त्यात तीन गोष्टी होणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं शरद पवार सगळ्यांना महणाले होते, आणि स्वतः काल भुजबळ यांनीदेखील त्याची कबुली दिली आहे.

Kamala Harris, presidential debate,
विश्लेषण : अध्यक्षीय डिबेटमध्ये कमला हॅरिस यांची बाजी? ट्रम्प यांची कोणत्या मुद्द्यांवर कोंडी? निवडणुकीवर परिणाम किती?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
pm narendra modi speaks to putin on his ukraine visit also discusses measures to strengthen ties
युक्रेन भेटीवरून मोदी-पुतिन चर्चा; संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अस्वस्थ करणारी दुसरी गोष्ट म्हणजे, आमची वैचारिक बैठक वेगळी आहे. आमची वैचारिक बैठक ही यशवंतराव चव्हाण यांची, शरद पवार यांची आहे. या माणसांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, मी अध्यक्ष झाले असते तर सर्वात आधी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता, जे माझ्यासाठी शक्य नव्हतं. कारण मी माझ्या विचारधारेशी, माझ्या वडिलांच्या विचारांशी तडजोड करू शकत नव्हते. माझ्यासाठी ते अशक्य होतं. माझ्या विचारधारेशिवाय मी कशी जगणार?

हे ही वाचा >> “शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता”, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; पडद्यामागचा घटनाक्रम सांगत म्हणाल्या…

शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका बाजूला सत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा निर्णय घेतला. छगन भुजबळ बोलले ते खरं आहे, मला अध्यक्ष करणार होते. परंतु, मी माझ्या विचारधारेवर ठाम राहिले.