शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात अनेक ठिकाणी गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही हा दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे देखील यात सहभागी झाल्या होत्या. या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा इशारा सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, ‘महाराष्ट्र ना कभी झुका है, ना कभी झुकेगा…’, ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं. त्या म्हणाल्या, आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. गद्दारांना गद्दार म्हटल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकणार असाल, तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका. मग आम्ही जेलभरो आंदोलन करू.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या, शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे बोलायला इतके पक्के आहेत की, त्यांनी कॅमेर्‍यासमोर ‘५० खोके’ तुम्हाला हवेत का… अशी ऑफर दिली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सांगितले पाहिजे की, तुमच्या सरकारमधील मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात. मोदीजी तुम्ही बोलला होतात ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ याची आठवणही सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.

हे ही वाचा >> औरंगजेब वाद : जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं? उद्धव ठाकरेंचा प्रश्न

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज टीव्ही आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आज २० जून म्हणजे गद्दार दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना घडल्या. त्या घटनेला टीव्हीवर ‘गद्दार दिवस’ म्हणत आहेत, हे पाहिले. परंतु माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली असं काहीजण म्हणत आहेत तर त्याच उध्दव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते हे विसरले का? असा टोलाही खासदार सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule says we will call them traitor rebel mlas shivsena eknath shinde asc