महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक मे रोजी आपण औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. रविवारी घेतल्या पत्रकार परिषदेमध्ये राज यांनी ही घोषणा केली. राज यांच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी वादामध्ये या सभेमुळे आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला
गुढीपाडव्याची सभा आणि त्यानंतर १२ तारखेला ठाण्यात घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंसोबतच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली. त्यामुळेच औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सभेसंदर्भात बोलताना आज औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर बोलताना सुप्रिया सुळेंनी राज यांच्या सभेला फार महत्व देऊ नका असा सल्ला दिलाय.
नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर
इतकं महत्व देताच कशाला?
“लोकं लोकांचं करतील आपण आपलं करायचं ना. तो येऊन भाषण देऊन जाईल. तुम्ही तुमचं काम करा. इतकं महत्व देताच कशाला?,” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात चिंता व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला.
नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर
थोडं मनोरंजन देखील नको का?
“येईल, भाषण देईल आणि जाईल. थोडा एंटरटेन्मेंट भी होना चाहिए यार. थोडं एंटरटेन्मेंट पण होऊ द्या ना. रोज दुर्दर्शन कशाला पहायचं? कधी तरी स्टार प्लस पण पाहा. किती दिवस सिरीयस पिक्चर पाहणार, थोडं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे की नको?,” असा उपहासात्मक टोला सुळे यांनी लगावला. सुळे यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या तर वाजवल्याच पण सभागृहात एकच हशा पिकला.
नक्की वाचा >> “मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने कधीही दिलेला नाही; त्यांनी असा एक तरी…”; राज यांना खुलं आव्हान
“औरंगाबाद दौऱ्यावर येथील शहर व ग्रामीण पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,आमदार सतीश चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,” अशा कॅप्शनसहीत सुप्रिया यांनी या कार्यक्रमातील काही फोटो ट्विटरवरुन शेअर केलेत.
राज ठाकरे अजित पवार आणि सुप्रियांबद्दल काय म्हणालेले?
सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली़ अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही़ आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोलाही त्यांनी लगावला.