महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत. सत्ताधारी पक्षांमधील काही आमदारांनी मंगळवारी दुपारी राजभवनाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांना टोला लगावला आहे.

शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केलं. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास नाही का? विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. तेथे यासंदर्भात चर्चा होणार होती. ज्या राजभवनाबाहेर आमदार आंदोलन करत होते तिथून सह्याद्री अतिथीगृह (जिथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली) हे अंतर केवळ पाच ते सहा मिनिटांचे आहे. पण या आमदारांपैकी कुणीही तिकडे गेले नाही.

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याचे दिसून येते. या सरकारमध्ये धोरणलकवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : “शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, १२ प्रकारच्या नोंदींसह जातप्रमाणपत्र…”, राज्य सरकारची मोठी घोषणा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अचानक ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.