Maharashtra Assembly 2024 Voting Updates: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर भारतीय जनता पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्यासह नाना पटोलेंचं नाव घेत काही ऑडिओ क्लिपचा संदर्भ दिला आहे. सुप्रिया सुळे या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात आता खुद्द सुप्रिया सुळेंनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजपाचे नेमके आरोप काय?

सुधांशु त्रिवेदींनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात दावे केले आहेत. माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी सुप्रिया सुळे व नाना पटोलेंवर आरोप केल्यानंतर त्यापाठोपाठ सुधांशु त्रिवेदींनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. विदेशी चलनाचा वापर करून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी सुधांशु त्रिवेदी यांनी केली आहे.

Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

सुधांशु त्रिवेदींचे पाच प्रश्न…

१. तुम्ही बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का?
२. डीलर गौरव मेहता व अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आहे का?
३. हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट तुमचं आहे का?
४. हे चॅट तुमचं असेल तर यामध्ये तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
५. या कॉल रेकॉर्डिंग्समधील आवाज तुमचाच आहे का?

सुप्रिया सुळेंनी दिलं आरोपांवर स्पष्टीकरण

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आज सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिलं आहे. “एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळलं की असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा

दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात आपण मानहानीचा दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिलं की बाहेर येऊन उत्तर द्यावं. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर माझं उत्तर असेल ‘नाही’. सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे आणि नंतर मी अवमान याचिका दाखल केली आहे”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

Supriya Sule : महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट्स दाखवत भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप

अजित पवार म्हणतात आवाज सुप्रिया सुळेंचा, त्यावर म्हणाल्या…

अजित पवारांनी तो आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याची प्रतिक्रिया दिल्याबाबत त्या म्हणाल्या, “ते अजित पवार आहेत. ते काहीही म्हणू शकतात. राम कृष्ण हरी. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. कुणीही चेक करावं. रवींद्र पाटील पोलीस अधिकारी आहेत. चॅनलवर दिसलं की ते दोन वर्षं जेलमध्ये राहून आले. त्यांनी माझ्यावर काही आरोप केले आहेत. माझ्या आवाजातली एक खोटी ऑडिओ क्लिप आहे”!

Story img Loader