राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस. गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील आमदार सत्तेत सामील झाल्याने पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर, दुसरीकडे आगामी लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झालाय. यातच, आज वाढदिवस साजरा होत असताना शरद पवारांच्या धैर्याचा, बुद्धीचातुर्याचा आणि त्यांच्या रणनीतीचं कौतुक केलं जातंय. शरद पवारांची लेक आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केलाय.

“आधी लढाई जनहिताची”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टला सुरुवात केली. “प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?

“मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे”, असं सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात?

“मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे, त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय”, असं त्या म्हणाल्या.

“संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असं म्हणत सुळेंनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असले तरीही शरद पवारांच्या वाढदिवासनिमित्त दोन्ही गटातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह नवाब मलिकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader