पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ साली भारत देश विकसित देश होईल असं सांगतानाच देशातील काही वाईट प्रवृत्तींवर आज लाल किल्ल्यांवरून प्रहार केला. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि द्वेषभावनेवरून त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर या तीन वाईट प्रवृत्तींचा नायनाट करावा लागेल, असंही ते म्हणाले. तसंच घराणेशाहीवर त्यांनी जोरदार प्रहार केला. त्यांच्या या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> Video: पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर केला तीन विकृतींचा उल्लेख; म्हणाले, “यांना हरवल्याशिवाय विकास अशक्य!”

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

“भ्रष्टाचार आणि घराणेशाही तर प्रत्येक पक्षात आहे. अमित शाहांनी लोकसभेत म्हटलं होतं की, जेव्हा तुम्ही एखाद्याला बोट दाखवता तेव्हा तीन बोटं स्वतःकडे असतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. म्हणजेच, भाजपातही घराणेशाही आहे, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

तीन वाईट प्रवृत्तींपैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. “आपल्या देशाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचारानं वाळवीप्रमाणे देशाच्या सामर्थ्याला पोखरून काढलं आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याच्याविरोधात लढा प्रत्येक क्षेत्रात होणं आवश्यक आहे. हा मोदींचा शब्द आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहीन”, असं ते म्हणाले.

“दुसरी अडचण म्हणजे आपल्या देशाला घराणेशाहीनं पोखरून ठेवलं आहे. घराणेशाहीनं देशाला बांधून ठेवलं आहे. त्यामुळे देशाच्या लोकांचे अधिकार हिसकावून घेतले आहेत”, असं ते म्हणाले.

“तिसरी अडचण म्हणजे द्वेषभावना. या द्वेषभावनेनं देशाच्या मूलभूत विचाराला, देशाच्या सर्वसमावेशच चारित्र्याला डाग लावला आहे. उद्ध्वस्त करून ठेवलं आहे”, अशा शब्दांत मोदींनी देशासमोरची तिसरी वाईट प्रवृत्ती नमूद केली.

“आपल्याला या तीन वाईट प्रवृत्तींविरोधात पूर्ण सामर्थ्यानिशी लढायचं आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण. ही आव्हानं आपल्यासमोर आहेत. या गोष्टी आपल्या देशाच्या लोकांमधल्या आकांक्षा दाबून टाकतात. लोकांचं शोषण करतात.आपले गरीब, दलित, मागास, पसमांदा, आदिवासी, महिला.. आपण सगळ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी या तीन वाईट प्रवृत्तींशी मुक्ती मिळवायला हवी. आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात संतापाचं वातावरण बनवायला हवं”, असं मोदी म्हणाले.