Suresh Dhas : महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आलं. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला आहे. आजही त्यांनी याबाबत भाष्य केलं. बीडच्या आरोपींना मोक्का लावा आणि त्यांना बिन भाड्याच्या खोलीत ठेवा असंही सुरेश धस म्हणाले आहेत. तसंच सलमान खानच्या तेरे नाम सिनेमाचं उदाहरणही त्यांनी दिलं.

काय म्हणाले सुरेश धस?

“मस्साजोग गावासाठी चांगलं काम करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या झाली. तो पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता. पण त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. अशा पद्धतीने गुन्हे घडले तर कुठलाही सरपंच समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घेणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं. सरपंचाची एक परिषद बोलवण्यात आली होती त्यावेळी सुरेश धस यांनी हे विधान केलं.

Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Fishing boat sinks in sea near Alibaug 15 sailors safe
अलिबागजवळ समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप
HMPV Virus Causes Symptoms Treatment in marathi
“HMPV विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, रुग्णालय अधिष्ठातांनी सज्ज राहणं आवश्यक”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका

संतोष देशमुखला विसरु नका-सुरेश धस

काळ गेल्यानंतर काही गोष्टी विसरल्या जातात. आताही थोडा काळ गेला तर संतोष देशमुखची आठवण विस्मृतीत जाऊ शकते. मात्र तुम्हा सगळ्या जमलेल्या सरपंचांना मी विनंती करतो की काहीही झालं तरीही संतोष देशमुखला विसरु नका. शेवटपर्यंत संतोषची आठवण मनात ठेवा. देशमुख कुटुंबीयांना कायम पाठिंबा द्या असं आवाहनही सुरेश धस यांनी यावेळी केलं.

हे पण वाचा- Dhananjay Munde Controversy: “मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन!

“यांचा तेरे नाम चित्रपटातील सलमान झाला पाहिजे”- धस

“या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करतोय. यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवलं पाहिजे. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ कुणालाही त्यांना भेटता आलं नाही पाहिजे. यांना एकटं पडू द्या. आकाची आणि आरोपींची अवस्था ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खानसारखी अवस्था झाली पाहिजे. हे खुळेच झाले पाहिजेत.” असंही धस यांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुखचा गुन्हा काय त्याने वॉचमनची मदत केली हा?-धस

सुरेश धस म्हणाले की, “सरपंच संतोष देशमुखचा गुन्हा काय होता? एका दलित वॉचमनला मारू नका हे तो सांगायला गेला, खंडणी घेऊ नका म्हणाला. त्यामुळेच त्याचा क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. त्याच्या मारहाणीचं चित्रिकरण करण्यात आलं, व्हिडीओ कॉल करण्यात आला. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. मध्येच सेलिब्रिटींचा मुद्दा आणला गेला आणि इतरही प्रकार करण्यात आले. पण या प्रकरणावरून आपलं लक्ष हटू देऊ नका.” असंही सुरेश धस म्हणाले.

Story img Loader