How Khokya Bhosale Arrested : भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीडचा नवा आका म्हणून ओळख असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली. एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याचं लोकेशन ट्रॅक करून पोलिसांनी प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याच्या अटकेची माहिती दिली असून त्याला कशी अटक करण्यात आली, याबाबत घटनाक्रमही सांगितला आहे. त्याला अटक करण्यात आल्यानंतर नवनीत कावत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले, सहा दिवसांपूर्वी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होतेच. दरम्यान, प्रयागराज येथे त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं आम्हाला कळलं. त्यामुळे त्या दिशेने आम्ही तपास सुरू केला. याकरता उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत खोक्या भोसलेला प्रयागराज येथून अटक केली आहे.

अटक केल्यानंतर काय?

दरम्यान, खोक्या भोसलेला परराज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला तत्काळ महाराष्ट्रात आणता येणार नाही. या प्रक्रियेविषयी नवनीत कावत म्हणाले, खोक्या भोसलेला दुसऱ्या राज्यात अटक केल्याने तेथील स्थानिक कोर्टाकडून ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागेल. ट्रान्सिट रिमांड घेतल्यानंतर रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे, जो मार्ग कमी वेळेत पोहोचेल अशा मार्गाने त्याला बीडमध्ये आणलं जाईल. उद्या किंवा परवा तो महाराष्ट्रात येईल. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

खोक्या भोसले कोण आहे?

खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. गोल्डमॅन म्हणूनही सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे. शिरुर कासार परिसात खोक्याची दहशत आहे. तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जातं.व्हिआयपी कल्चर, व्हिआयपी कार, हातात सोन्याचे ब्रेस आणि कडे, तसंच गळ्यात सोन्याची माळ असल्याने त्याला गोल्डमॅन म्हटलं जातं.

सतीश भोसले हा उंची आणि लॅव्हिश आयुष्य जगतो. त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. तसंच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उधळताना दिसतो आहे. सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असंही दिसतं आहे. मागच्या सहा ते सात वर्षांपासून खोक्या भोसले राजकारणात सक्रीय आहे. सतीश भोसले हा बीडच्या शिरुर शहराजवळ पारधी वस्तीत राहतो. सतीश अर्था खोक्या भोसलेल्या भोवती अनेकदा लोकांचा गराडा असतो. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत.