भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी धस यांची उमेदवारी जाहीर केली.
मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यावेळ धस यांचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. पक्षाच्या नेत्यांची सोमवारी मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये धस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीडमध्ये आम आदमी पक्षाने अभिनेते नंदू माधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात नंदू माधव आणि सुरेश धस असा सामना रंगणार आहे.
आणखी वाचा