Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातला मास्टरमाईंड असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड हादेखील पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. पुण्यातल्या सर्वपक्षीय मोर्चात त्यांनी बीडचा हमास आणि तालिबान या लोकांनी केला असं म्हणत टीका केली आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिला आहे असंही उदाहरण त्यांनी दिलं. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”

अजित पवारांनी जरा डोळे उघडून बघावं की नेमकं काय चाललं आहे-धस

सुरेश धस म्हणाले की, मी अजितदादांवर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. ते लायकवान माणसं नाहीत. अजितदादांनी डोळे उघडून खाली पाहिलं पाहिजे की नेमकं काय चाललं आहे. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्य समोर येईल. तो सूरज चव्हाण माझ्यावर बोलला. अरे तो अजून बालवाडीतही नाही. तुम्ही काय बोलायचं ते बोला, मी तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवायचं नाही. फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण जातीपाती या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहेत. असं सुरेश धस म्हणाले.

हे पण वाचा- Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”

बीडचा हमास, तालिबान करुन टाकला

मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय अशी जहरी टीका सुरेश धस यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं.

Story img Loader