Suresh Dhas : बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. दरम्यान खंडणी प्रकरणात असलेला वाल्मिक कराड आणि त्याची टोळी याबाबत सुरेश धस सातत्याने आवाज उठवत आहेत. वाल्मिक कराडचा उल्लेख त्यांनी आका असा अनेकदा केला आहे. तर आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे यांचाही उल्लेख अनेकदा केला आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आरोपांच्या नव्या फैरी झाडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले सुरेश धस?

“जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत बोगस बिलं उचलण्यात आली. २०२१ ते २०२२ या कालावधीत यावेळी पालकमंत्री कोण होते? तर धनंजय मुंडे. परळी आणि आंबाजोगाईतली कामं न करता बिलं उचलली गेली. ३० डिसेंबर २०२१ रोजी २ कोटी ३१ लाख, १८ मार्च २०२२ ला कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड यांनी १० कोटी ९८ लाख, २५ मार्च २०२२ कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अंबाजोगाई यांनी ६ कोटी ५९ लाख, २६ मार्च २०२२ कार्यकारी अभियंत विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक २ १६ कोटी ४८ लाख रुपये, ३१ मार्च २०२२ या दिवशी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड यांनी १ कोटी ३४ लाख अशी एकूण ३७ कोटी ७० लाख रुपयांची बोगस बिलं उचलली. यातही संजय मुंडे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले आहेत, ते डेप्युटी इंजिनिअर होते. २५ जून २०२२ ला उप अभियंता संजय मुंडे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. ही मोडस ऑपरेंडी आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून जिल्हा परिषदेकडे पैसे फिरवायचे, तिथून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फिरवायचे. ३१ मार्चलाच ते पैसे उचलण्याची गरज नाही. २५ जून २०२२ ३७ कोटी ७० लाख रुपये एक रुपयाचंही काम न करता उचलले आहेत.” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.

एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिलं दिली गेली आहेत-सुरेश धस

सुरेश धस पुढे म्हणाले, एक रुपयाचं काम न करता ३७ कोटी ७० लाख रुपये उचलण्यात आलेत. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा धनंजय मुंडे पालकमंत्री होते. १५ डिसेंबर २०२१ रोजी नऊ कामांचे १५ कोटी रुपये, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी एका कामाचे १ कोटी २० लाख रुपये. एकूण १६ कोटी २० लाख रुपये पैसे उचलण्यात आले. अर्थसंकल्पीय कामांच्या अंतर्गत ५९ रुपयांचे रस्ता काम असून ६ कोटींचं काम मंजूर करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं असाही आरोप सुरेश धस यांनी केली. परळी, कूस, बर्दापूर या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये काम न करता उचलण्यात आले असा आरोप सुरेश धस यांनी केला. १३ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत म्हणजेच मविआच्या काळात ३७ कोटी ७० लाख, १४ कोटी ४६ लाख रुपये, १६ कोटी २० लाख रुपये आणि ५ कोटी असे एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपये बोगस बिलांच्या आधारे उचलण्यात आले. महाराष्ट्रात कोणत्याही एका मतदारसंघात इतकी बोगस बिलं कुणीही दिलेली नसतील. मी पाचव्यांदा आमदार झालो आहे त्या एवढा मोठा उद्योग केलेला नाही. माननीय त्यावेळचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कालावधीत ७३ कोटी ३६ लाखांची बोगस बिलं उचलली आहेत. माझ्याकडे तीन फाईल्स आहेत असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे सगळे तपशील आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तुम्ही पत्रकारांनी तुमच्या तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मी तुम्हाला देतो त्या याद्या पोस्ट करा असं आवाहन सुरेश धस यांनी केलं.

अजित पवार यांनी मला अरे जारे केलं तरीही मला राग येण्याचा प्रश्न नाही

मी राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पत्र देणार आहेत. तसंच उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत त्यांना ही माहिती देणार आहे. आपले शागीर्द कसा कारभार करत आहेत ते अजित पवार यांना कळलं पाहिजे. असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ही बिलं उचलून दिल्यानंतर संजय मुंडे या ठिकाणी नाहीत. ते कुठे गेले आहेत हे समजू शकलेलं नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांनी माझा एकेरी उल्लेख केला तरीही मला त्याचा राग येण्याचा प्रश्न नाही कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत.