Suresh Mhatre : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश अर्थात बाळ्यामामा म्हात्रे ( Suresh Mhatre ) यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. याचं कारण होतं जेव्हा बाळ्यामामा म्हणजेच सुरेश म्हात्रे ( Suresh Mhatre ) देवेंद्र फडणवीस यांना भेटले तेव्हा त्यांच्याबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे होते. शरद पवारांची साथ आता सुरेश म्हात्रे सोडणार का? या चर्चा यामुळेच सुरु झाल्या. याबाबत बाळ्यामामांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी म्हणजेच २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास सुरेश म्हात्रे ( Suresh Mhatre ) हे धनंजय मुंडेंसह सागर बंगल्यावर पोहचले. या तिघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर सुरेश म्हात्रे तिथून निघून गेले. मात्र यानंतर सुरेश म्हात्रे ( Suresh Mhatre ) अर्थात बाळ्यामामा शरद पवारांची साथ सोडून भाजपात जाणार का? या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान दिल्लीत पत्रकारांशी चर्चा करत असताना हा प्रश्न जेव्हा बाळ्यामामा अर्थात सुरेश म्हात्रेंना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Ramdas Athawale on Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदेंना काय सांगितले? रामदास आठवले म्हणाले…
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

काय म्हणाले सुरेश म्हात्रे?

तुम्ही शरद पवारांची साथ सोडणार की त्यांच्याबरोबर आहात? असं विचारलं असता सुरेश म्हात्रे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना मी व्यक्तिगत कामासाठी भेटलो. राजकीय काहीही विषय नव्हता. मी शरद पवारांसह आहे. दुपारी दोन वाजता राजकीय भेट घेण्यासाठी कुणी जातं का?” असा प्रश्नही सुरेश म्हात्रेंनी विचारला.

मी शरद पवारांची साथ सोडण्याचा प्रश्नच नाही

मी शरद पवारांची साथ सोडणार वगैरे सगळे तर्क माध्यमांनी लावले आहेत. एकमेकांना भेटलो की तेव्हा फक्त राजकारणच होतं असं नाही. मी खासदार आहे, आमदारही नाही. तसंच शरद पवारांची साथ सोडण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली.

हे पण वाचा- Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांनी चक्क चहाविक्रेत्याला दिलं शपथविधीचं आमंत्रण; नेमकं कनेक्शन काय?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपामध्ये झालेला राजकीय संघर्ष सर्वांनी पाहिला. पण आता शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र भेट राजकीय नव्हती असं म्हणत आता म्हात्रे यांनी स्वत : याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.