गौण खनिजांवरील बंदी अजून कायम असून माजी खासदार सुरेश प्रभू या प्रकरणी दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी येथे केली. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्याशी आपली चर्चा झाली असून राज्यातील गौण खनिजांवरील बंदी उठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती प्रभू यांनी गेल्या आठवडय़ात येथील वृत्तपत्रांना दिली होती. त्यावर गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गेली साडेचार वष्रे बेपत्ता असलेले माजी खासदार प्रभू अचानक दिसू लागले आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री नटराजन यांच्याशी ज्या दिवशी चर्चा झाल्याचे प्रभू सांगतात त्या दिवशी नटराजन चेन्नईत होत्या. गौण खनिजांवरील बंदी उठवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे कोणालाही माहीत नाही. तशा आदेशाची प्रत राज्य शासनाला मिळालेली नाही.

Story img Loader