महापालिका हद्दीअंतर्गत देवळालीतील शेत जमीन प्रकरणी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी या व्यवहारात बऱ्याच करामती केल्याचे सलग दुसऱ्यांदा त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे अधोरेखीत झाले आहे. दुसऱ्या प्रकरणात त्यांना अद्याप अटक झाली नसली तरी पहिल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. प्रारंभी महसूल यंत्रणेच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढणाऱ्या वाडकर यांनी स्वत: कशा पध्दतीने व्यवहार केला, यावर या विभागातील अधिकारी बोट ठेवत आहेत.
काही मुद्यांवरून हा विषय सुरुवातीला महसूल यंत्रणेसमोर आला होता. तेव्हा महसूल अधिकाऱ्यांना लक्ष्य करत वाडकर यांनी अशा यंत्रणेतील देशात राहण्याऐवजी परदेशात राहिलेले बरे असे म्हटले होते. तथापि, पुढील काळात याच व्यवहारातील वेगवेगळ्या बाजू पुढे येत आहेत. शेतजमीन खरेदीत खोटय़ा करारनाम्यातील दस्त खरा असल्याचे भासवून स्वत:चे नाव मिळकतीच्या महसूल दप्तरी बेकायदेशीररित्या नोंदवून घेण्याच्या प्रकरणात नाशिकरोड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वाडकर यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा