ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला त्यांचा भाऊ सापडला आहे. मागील १८ वर्षांपासून अंधारे कुटुंबीय त्यांची वाट पाहात होते. अखेर सुषमा अंधारे यांच्या बॅनर्समुळे हा भाऊ घरी परतला आहे. तब्बल १८ वर्षांनंतर भावाची भेट झाल्यामुळे सुषमा अंधारे यांनी आनंद व्यक्त केला आहे. युवराज जाधव असे त्यांच्या भावाचे नाव आहे.

१८ वर्षांनी आमचं वाट बघणं संपलं- सुषमा अंधारे</strong>

तब्बल ११ वर्षांनी भाऊ परतल्यामुळे सुषमा अंधारे यांनी आनंद व्यक्त केला आहे. “भाऊ परतल्यामुळे आम्ही सगळेच आनंदी आहोत. हो थोडंसं धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहे. स्वत: युवराजसाठीही हे थोडं अवघड आहे. सगळ्या संमीश्र भावना आहोत. आम्ही सगळेच भावनिक गोंधळात आहोत. पण काहीही असो आज १८ वर्षांनी आमचं वाट बघणं संपलेलं आहे. आमचा भाऊ आमच्यासोबत आहे. यापेक्षा आणखी काय हवं,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

मी सध्यातरी गोंधळलेला आहे, माझ्या ताईमुळे मी परतलो- युवराज जाधव

सुषम अंधारे यांचे बंधू युवराज जाधव यांनीदेखील घरी परतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. मी सध्यातरी गोंधळलेला आहे. मी माझ्या परिवाराला तब्बल १८ वर्षांनी भेटत आहे. मी माझ्या ताईमुळेच त्यांना सापडू शकलो,” असे युवराज जाधव यांनी सांगितले.

Story img Loader