राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांशी सख्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. आजही (१२ ऑगस्ट) पुण्यात या दोन्ही नेत्यांची एका बड्या उद्योगाच्या घरी बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित होते. या गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक? राजकीय चर्चांना उधाण

“माध्यमातून समोर येणाऱ्या दृश्यांवरून प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा देशात आणि राज्यात वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. पवारांना असं जरी वाटलं की दादा आणि पवारसाहेब एकत्र येणार आहेत, तर त्यावरही ते उघडपणे भाष्य करण्याइतके सक्षम आहेत. ते तसे सक्षमपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, अंधारात ठेवायचं आहे, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत आम्ही घाईघाईने निष्कर्ष काढणे आणि बोलणे योग्य ठरणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा >> “जनतेतील संभ्रम…”; अजित पवार-शरद पवार यांच्या गुप्त बैठकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

“उद्या किंवा परवा शरद पवार बोलणार आहेत. मुंबईत या दोन नेत्यांची भेट झाली होती तेव्हाही ते बोलणार होते. त्यावेळेला बंगळुरूला बैठक होती, म्हणून त्यांना माध्यमांशी चर्चा झाली नाही. माझ्या माहितीनुसार पवार यावर बोलणार आहेत. ते चांगल्या प्रकारे याप्रकरणावर प्रकाश टाकू शकतील”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushama andhare reaction on sharad pawar and ajit pawar meet in pune sgk
Show comments