भाजपने कितीही जाहिरातबाजी व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तरी देशात सलग तिसऱ्यांदा काँग्रेस आघाडीचीच सत्ता येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी केला.
लातूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, आमदार अमित देशमुख आदी उपस्थित होते. िशदे म्हणाले की, २००४ मध्ये भाजपने देशभर ‘फिलगुड’चा नारा दिला. परंतु त्यानंतर सत्ता काँग्रेसची आली. मागील वेळी भाजपने पुन्हा खोटा प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. या वेळी नव्याने जोर काढून भाजप देशभर जणू काही आपली सत्ता आली असे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र, सामान्य जनता काँग्रेस आघाडीच्या पाठीशी असल्यामुळे देशात काँग्रेस आघाडीचीच सत्ता येईल.
उपमुख्यमंत्री पवार प्रथमच लातूरला आघाडीच्या प्रचारसभेत आल्यामुळे ते काय बोलतात, याचे औत्सुक्य होते. राज्यातील विरोधी मंडळी स्वयंघोषित पांडव आहेत. स्वतच स्वतचे कौतुक करून घेत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. चहा विकणाऱ्या मोदींकडे एवढा पसा कुठून आला? असा सवालही उपस्थित केला. शिवसेनेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवत बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना दुभंगली जात असल्याचे ते म्हणाले. विलासराव देशमुख दिलदार नेते होते. लातूरचा विकास त्यांच्यामुळेच झाला. मागील वेळी अतिशय कमी मतांनी काँग्रेसची जागा आली होती. बारामती, सांगली भागात मताधिक्याने उमेदवाराला विजयी करण्याची प्रथा आहे, तीच प्रथा लातूरकरांनी पाळावी, असे ते म्हणाले.
आमदार दिलीपराव देशमुख यांनी भाजप म्हणजे अवकाळी, तर काँग्रेस म्हणजे मोसमी पाऊस आहे. अवकाळी पावसाचे परिणाम काय होतात हे आपण अनुभवले आहे. भाजपच्या भुलथापाला बळी न पडता कायमस्वरूपी साथीला असलेल्या मोसमी पावसावर म्हणजे काँग्रेसवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले. अमित देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार सच्चे गुरुजी असून, विरोधी पक्षाचे सच्चे आहेत का हे तपासा. भाजपत मोदींपासून सारेच बंडलबाज आहेत याची जाणीव ठेवा व काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले.
सभेनिमित्त टाऊन हॉलच्या मदानावर काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, डेमॉक्रॅटिक व जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स पार्टी यांची मूठ त्यांनी यशस्वी करून दाखवली. माजी आमदार उल्हास पवार, आमदार बाबासाहेब पाटील व वैजनाथ िशदे, महापौर स्मिता खानापुरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे मान्यवर उपस्थित होते.