सोलापूर : राज्यात टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांना आकारली जाणारी पथकर वसुली बंद करण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालविलेल्या आंदोलनामुळे शांतता भंग होत असल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नापसंती व्यक्त करीत, शांतता भंग करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी, असे मत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरात प्रसार माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना शिंदे यांनी टोलनाक्यावरील पथकर वसुलीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरही मत मांडले. टोल नाक्यांवर वाहनांना आकारल्या जाणाऱ्या पथकर वसुलीसंदर्भात शासनाने नेमके धोरण आखावे. मोघम आणि खोटी वक्तव्ये केल्याने संभ्रम निर्माण होतो. त्याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवे, अशा शब्दात शिंदे यांनी फडणवीस यांना कानपिचक्या दिल्या.

हेही वाचा – “आम्ही काँग्रेसबरोबर असणं ही राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

हेही वाचा – सातारा: उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व पोलिसांचा सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात सुरू असलेल्या संघर्षामध्ये शरद पवार गटाची बाजू भक्कम असल्यामुळे निवडणूक आयोगासह न्यायालयीन लढाईत याच गटाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशात हिंदू-मुस्लीम वाद केवळ राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक वाढविण्याचा प्रयत्न होत असून त्यावर अधिक भाष्य करून वादाला खतपणी घालू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.