महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी राज्य सरकारची मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं वृत्त एका मराठी वर्तमान पत्राने प्रसिद्ध केलं होतं. या वृत्ताचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून या योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च कलेल्या मार्च आणि एप्रिल २०२३ मधील खर्चाची आकडेवारी मांडली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बोट दाखवलं. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रीसुद्धा आहेत.

Tilak Street , Pune, vehicle broke door shop ,
पुणे : टिळक रस्त्यावर मध्यरात्री थरार, भरधाव मोटार दुकानाच्या दरवाजा तोडून आत शिरली
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये साधारतः अडीच ते तीन हजार बांधकाम कामगार असावेत. परंतु आम्ही माहितीच्या अधिकारांत जळगाव जिल्ह्यासंबंधीची माहिती मागवली असता आम्हाला सांगण्यात आलं की, एकट्या जळगावात ३५ ते ४० हजार कामगार मध्यान्ह योजनेचा लाभ घेत आहेत. खरंतर कुठल्याच जिल्ह्यात इतके बांधकाम कामगार नसतात. तरीदेखील त्यांनी इतका मोठा आकडा सांगितला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मध्यान्ह भोजन योजनेवर १४ ते ३० सप्टेंबर या १५ दिवसांमध्ये ५८.६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तर ऑक्टोबर महिन्यात हाच खर्च वाढून २ कोटी ८७ लाख रुपये इतका वाढला आहे. हा खर्च पुढच्या काही महिन्यांमध्ये अनेक पटींनी वाढला. एकट्या फेब्रुवारी महिन्यात मध्यान्ह भोजन योजनेवर ७ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर मार्च आणि एप्रिल महिन्यात या योजनेवर २५.२७ कोटी रुपये खर्च झाला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात या योजनेचे इतके लाभार्थी कसे काय? ते कोण आहेत, कुठून आले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा >> “त्यांना विचारा, वासना आणि देश…”, RAW मधील मुस्लीम अधिकाऱ्यांच्या कपातीवरून ओवैसींचा प्रश्न

सुषमा अंधारे म्हणाल्या, या योजनेतील लाभार्थ्यांची यादी आम्ही मागवली. या यादीत ज्यांची नावं आणि फोन नंबर होते त्यांना आम्ही फोन केले. तर हे लोक आमच्याशी गुजराती भाषेत बोलू लागले. आम्ही गुजरातमध्ये राहतो. कधी महाराष्ट्रात आलोच नाही, अशी उत्तरं आम्हाला मिळाली. तर काही लोकांनी सांगितलं आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. त्यामुळे हे सगळे लाभार्थी खोटे असून योजनेवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठे गेले असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader