भाजपा नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे आणि अभिनेत्री राखी सावंत या बहिणी असल्याचे म्हटले होते. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमात. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत, की रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल, असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याला आता सुषमा अंधारेंनी सभेत बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. “बाईपणावर हल्ला करणे हा षड्यंत्र आणि कटाचा भाग आहे. त्याला मी भीक घालणार नाही. बाईपणाचे कोणतेही विक्टीम कार्ड खेळणार नाही. मी लढेन आणि जिंकेलही,” असे सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : अजित पवार आमदारांसह नॉटरिचेबल? शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

“कंबोजची प्रवृत्ती चांगली नाही. त्याची प्रवृत्ती चांगली असती, तर राखी सावंतची तुलना अजून कोणशीतरी केली असती. पण, राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीस यांच्याबरोबर होईल. कारण, राखी सावंतच्या चेहऱ्याची सर्जरी झाली, अमृता वहिनींच्या सुद्धा चेहऱ्याची सर्जरी झाली… राखी सावंत गायक आहे… अमृता वहिनी सुद्धा गायक आहेत. राखी सावंत मॉडेल आहे… अमृता वहिनी सुद्धा मॉडेल आहेत,” असं टोमणा सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

हेही वाचा : “गौतम अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं”, शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“राखी सावंतचे क्षेत्र भलेही कोणतेही असो, तिच्याबद्दल बोलताना तुमची जीभ सैल सुटते, याचा अर्थ गृहमंत्र्यांचा पोलिसांवर वचक नाही. पोलिसांना वचक नावाची गोष्ट कळत नाही. त्यांना फक्त हफ्ते नावाची गोष्ट कळते,” अशी टीकाही सुषमा अंधारेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare compare amruta fadnavis with rakhi sawant reply mohit kamboj ssa