सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांया नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधातही षड्डू ठोकला आहे. यामुळे ते सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सदावर्तेंना लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु, सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर खेळी करत आहेत, ही एक राजकीय खेळी आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला आहे, असं वातावरण तयार झालं. मी फडणवीसांचा माणूस नाही किंवा फडणवीसांशी तसा अर्था अर्थी संबंध नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून सदावर्ते फडवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु, लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकंच खरं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. म्हणजे, गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेला संप ही राजकीय खेळी असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >> “हा ज्याचा-त्याचा अधिकार”, बाबासाहेब आंबेडकर अन् शिवरायांशी होणाऱ्या तुलनेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विमानतळावर भेट घेतली. याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “सत्तेतील घटकपक्ष आहेत, राज्यातील सत्तेत ते एकत्र आहेत. त्यामुळे सत्तेतील घटकपक्षानी एकमेकांशी काय बोलावं, काय नाही बोलावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहेत. परंतु, दादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा असू शकते. कारण, दादा गटाची जवळीक भाजपाशी निश्चितपणे जास्त वाढली आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticise gunratna sadavarte over st bandh sgk
Show comments