शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकांवरून जोरदार शाब्दिक हल्ला केला. “देवेंद्र फडणवीस त्यांचा आणि गुणरत्न सदावर्तेंचा संबंध नाही म्हणतात, पण सदावर्ते ‘आय लव्ह यू फडणवीसजी'”, असं म्हणत असल्याची टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यात एकही जमावाकडून हत्या करण्याची घटना घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात एकही जातीय-धार्मिक दंगल घडली नाही. सध्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यात विचार करा की, एकीकडे देवेंद्र फडणवीस होय आम्ही आरक्षण देणार आहोत असं म्हणतात.”

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

“‘आय लव्ह यू फडणवीसजी’, असं सदावर्ते म्हणत आहेत”

“दुसरीकडे फडणवीसांचाच चेला असलेले गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, श्रद्धेय देवेंद्र फडणवीसांना काय ते माहिती आहे, मी आरक्षण मिळू देणार नाही. फडणवीस सांगतात की, त्यांचं आणि सदावर्तेंचा काही संबंध नाही आणि सदावर्ते श्रद्धेय फडणवीस म्हणतात. फडणवीस आमचं श्रद्धास्थान आहे, ‘आय लव्ह यू फडणवीसजी’, असं सदावर्ते म्हणत आहेत,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा : “ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, कारण…”; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…

“…उसने इसे ठुकरा दिया फुटबॉल समझकर”

“म्हणजे एकूण सगळा खेळ जर बघितला तर आपल्या लक्षात येतंय की, इसने उसे दिल दिया दिलदार समझकर, उसने इसे ठुकरा दिया फुटबॉल समझकर. असा यांचा सगळा खेळ चालू आहे,” असा टोलाही सुषमा अंधारे यांनी फडणवीस-सदावर्तेंना लगावला.

Story img Loader