मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा-बच्चू कडू वाद संपुष्टात येत असतानाच काल रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने हा वाद पुन्हा एकदा सुरू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रवी राणा आणि भाजपावर टीकास्र सोडले आहे. राणांच्या माध्यमातून बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – शीना बोरा अजूनही जिवंत, इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
बच्चू कडू यांचे व्यक्तिमत्त्व फार चांगलं आहे. ते लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत, अशा व्यक्तीवर आरोप करणं ही क्लेषकारक आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली होती, ती एका अर्थाने योग्य होती. कारण प्रश्न त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा होता. रवी राणांसारखी माणसं जी उथळ व्यक्तव्य करत, ती कायम लोकांमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण करतात. अमरावतीत कुपोषणासारखे अनेक प्रश्न आहेत, त्यावर ते बोलत नाहीत. मात्र, अशी वक्तव्य करून वाद पेटण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : कार शिकवणे जीवावर बेतले!; ७० फूट खोल विहिरीत कोसळून पत्नी- मुलीचा करुण अंत, पती गंभीर
संविधानानुसार राज्यापालांकडे विशेषाधिकार आहेत. त्यांचा त्यांनी वापर करायला हवा. एकाद्या लोकप्रतिनिधीचे चरित्रहनन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असेल आणि असा प्रयत्न करणारी व्यक्ती सभागृहाची सदस्य असेल, तरी त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यापालांनी करायला हवी, अशी कायद्यातली तरतूद आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवी राणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवणार का? असा प्रस्तावर त्यांनी ठेवला, तरच आम्ही समजू की त्यांना खरंच बच्चू कडूंना न्याय द्यायचा आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच रवी राणांद्वारे बच्चू कडूंची कारकीर्द संपवण्याचा भाजपा हा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.