निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. दम्यान, यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडायला लागतात, तेव्हा समजून घ्याव की अंधार जास्त पडतो आहे. हे सर्व भाजपाचे कारस्थान आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला; अमेय खोपकर ट्वीट करत म्हणाले, “चिन्हं बदलतात…”

दरम्यान, निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरेंना धक्का देत ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट, अशी नावे वापरू शकतो, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Story img Loader