Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Marathi News : ललित पाटील प्रकरणामुळे राज्यात अमली पदार्थ तस्करीचा प्रकार उजेडात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचा साठाही जप्त केला जातोय. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांवर तोफ डागली आहे. तसंच, याप्रकरणी मांडवली करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी काही लोकांची नावेही जाहीर केली आहेत. त्या आज ठाकरे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळावा कार्यक्रमात बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “शेकडो कोटींचा ड्रग्स सापडतो, तेव्हा नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? एक्साईजचा मंत्री काय करतो? काय चाललेलं असतं पुण्याच्या एसपीचं. हे प्रश्न विचारले की पुण्याचे मंत्री धमकावतात, घाबरवतात. आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करू. आम्ही नोटीसी पाठवू, आम्ही हे करू, आम्ही ते करू.”

Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा >> “महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होऊ द्यायचा नाही म्हणून…”, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

त्या पुढे म्हणाल्या की, माध्यमांसमोर सांगितलं पाहिजे की, १० दिवसांपासून मला नोटीस पाठवली म्हणणारे लोक अंधारातून माझ्याशी मांडवली करण्याची भाषा करतात. त्यांची नावं घ्यायची आहेत का? नाशिकमधला अमन परदेशी फोन करतो पुण्यातल्या नलिनी वायाळला, पुण्यातली नलिनी वायाळ फोन करते कोणातरी गोगावलेला. गोगावले पोहोचतात माझ्या जवळच्या जठारपर्यंत. माझ्यावर दबाव आणतात, घाबरवतात आणि सांगतात अब्रुनुकसानीचा दावा करू. इकडे एक बोलतात आणि तिकडे एक बोलतात, खरं काय खोटं काय? आणि तुम्ही माझ्यावर अब्रु नुकसानीचा दावा करताय? महाराष्ट्राच्या अब्रुची ज्यांना चाड नाही त्यांनी, व्हाया सुरत गुवाहाटी जाताना कुठे होती अब्रु? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था

मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरु? अशी म्हण आहे. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची अवस्था अशीच असेल. गृहमंत्र्यांना विचारलं की म्हणतात मुखवटे बाहेर येतील. मी याँव करीन आणि त्याँव करीन. गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यांखाली अडकवलंच ना? गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला मागचे नऊ महिने का लपवलं होतं? त्यासाठी इतका वेळ का लागला? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. ललित पाटील आमच्या पक्षाचा आहे हे सांगत आहात. मात्र आज तुम्हाला सांगते आहे बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. इथे पक्षाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रातला तरुण व्यसनाधीन व्हायला नको ही आमची भूमिका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांना अनेकजण चाणक्य म्हणतात मला ते अजिबात पटत नाही

देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार त्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवलं. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? त्यांनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. तुमच्याकडे बोलायला लोकच नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक लोक तुम्ही संपवले आहेत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत? हा माझा त्यांना सवाल आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader