राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावरून मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपा पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या नाराजीनाट्यावरून टीकास्र सोडलं. अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपानं लिहिली होती, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा- उष्माघात नव्हे तर चेंगराचेंगरीत १४ जणांचा मृत्यू? आव्हाडांनी थेट VIDEO शेअर करत विचारला सवाल

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपानं लिहिली आहे. ‘वज्रमूठ’ सभा आणि खेड व मालेगाव येथील सभांमधून महाविकास आघाडीला जो वाढता प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे भाजपाला भीती वाटत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची अलीकडची विधानं आपण तपासून बघितली, तर ती विधानं पुरेशी बोलकी आहेत. आधी त्यांनी काय विधानं केली आणि नंतर काय विधानं केली. या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस कमालीचे मौन बाळगून आहेत. पण त्यांचं हे जे मौन आहे, हेच खरं रहस्यमयी आहे. त्यामुळे कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, अजित पवारांच्या नाराजीनाट्याचा ‘स्क्रिप्ट रायटर’ कोण आहे? याचं उत्तर फडणवीस चांगल्याप्रकारे देऊ शकतात.”

हेही वाचा- “अमित शाहांबरोबर झालेली चर्चा उघड करणार नाही”, राज्यातील सत्तांतरावर आशिष शेलारांचं मोठं विधान

नाराजीनाट्याबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण या निमित्ताने शिंदे गटातील बोलघेवडे लोक उघडे पडले आहेत. त्यांची अजित पवारांबाबतच्या घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखुचा बार भरून बोलतात, असं दिसतं. पण महाविकास आघाडी अभेद्य आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare on ajit pawar upset joining bjp with 40 ncp mlas devendra fadnavis wrote script rmm
Show comments