शिवसेनेचे (ठाकरे गट) बीड जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना दोन चापट्या मारल्याचा दावा केला. तसेच गंभीर आरोप केले. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आता स्वतः सुषमा अंधारेंनी या घटनाक्रमावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच खरंच त्यांना मारहाण झाली का यावर स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली. त्या शुक्रवारी (१९ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुषमा अंधारे म्हणाल्या, “सुषमा अंधारेंवर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस समोर येऊन स्वतःच सांगतो की मी हाच उचलला. याचा अर्थ निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो.”

“तुम्हाला मारहाण झाली का?”

“तुम्हाला मारहाण झाली का?” यावर सुषमा अंधारे स्पष्टपणे म्हणाल्या, “नाही. मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का. हे प्रकरण आतापर्यंत थांबलं असतं का. हा दावा करून त्यांना गोंधळ तयार करायचा आहे. यातून आमचं सभेवरील लक्ष विचलित व्हावं असं त्यांना वाटतं.”

हेही वाचा : सुषमा अंधारेंसमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

“त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे”

“काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे,” असंही सुषमा अंधारेंनी नमूद केलं.

आप्पा जाधवांचा नेमका दावा काय?

अप्पा जाधव म्हणाले, “सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.”

व्हिडीओ पाहा :

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, सुषमा अंधारे सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’निमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये होणार आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. पण त्यांचा हा आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे म्हटलं आहे.